चोवीस हजार खटल्यांचे काम ठप्प
By admin | Published: September 12, 2015 12:44 AM2015-09-12T00:44:24+5:302015-09-12T00:50:15+5:30
सर्किट बेंच प्रश्न : खंडपीठ कृती समितीची रविवारी कोल्हापुरात बैठक
कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’प्रश्नी सुरू असलेल्या तीन दिवसीय ‘काम बंद’ आंदोलनाचा न्यायालयीन कामकाजावर चांगलाच परिणाम झाला. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे २४ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प झाले.खंडपीठ कृती समितीने जिल्हा न्यायालयासमोरील ठिय्या आंदोलनाचा शुक्रवारी दुपारनंतर समारोप केला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कृती समितीची उद्या, रविवार जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी सहा जिल्ह्यांतील २०० पेक्षा जास्त वकील उपस्थित राहणार आहेत.
सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने सर्किट बेंचसाठी संघर्ष करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी ‘सर्किट बेंच’चा निर्णय न घेताच सेवानिवृत्ती घेतल्याने संतप्त वकिलांनी त्यांचानिषेध केला. त्यानंतर ९ ते ११ सप्टेंबरअखेर सहा जिल्ह्णांतील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. गुरुवारी काढण्यात आलेल्या महारॅलीमध्येही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग दर्शविला होता. गेली तीन दिवस सहा जिल्ह्णांतील १५ हजार वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. वकिलांच्या या ‘काम बंद’ आंदोलनामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे सहा जिल्ह्णांतील सुमारे २४ हजार खटल्यांची कामे ठप्प राहिली. दरम्यान, जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. उल्हासदादा पाटील, माजी आ. संजय घाटगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, बाबासो देवकर, नाथाजी पोवार यांच्यासह पक्षकार, नागरिक, सामाजिक संघटना आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आंदोलनासाठी ५० हजार रुपयांची मदत दिली. आंदोलनस्थळी उपस्थितांचे स्वागत अॅड. अजित मोहिते, के. ए. कापसे, महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, धनंजय पठाडे, राजेंद्र जानकर आदींनी के
‘सर्किट बेंच’च्या संघर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सर्वांत पुढे असतील.
- हसन मुश्रीफ, आमदार
‘सर्किट बेंच’साठी होणाऱ्या आंदोलनामध्ये आपण अग्रभागी राहू.
- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री
‘सर्किट बेंच’ची चळवळ अधिक तीव्र करू व प्रसंगी स्वत: त्यात पुढाकार घेऊ.
- उल्हास पाटील, आमदार
‘सर्किट बेंच’चा
निर्णय अर्ध्यावर ठेवून न्या. शहा यांनी घोर निराशा केली आहे.
- प्रकाश आबिटकर, आमदार