'कोल्हापुरात असं कधीच घडलं नाही, सर्वांनी सलोख्याने राहावं; शाहू महाराज छत्रपतींची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 01:54 PM2023-06-08T13:54:49+5:302023-06-08T14:08:40+5:30
काल कोल्हापुरात झालेल्या गोंधळानंतर आज शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली.
काल कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावर आज कोल्हापुरचे शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बंदला हिंसक वळण, कोल्हापुरात तणाव; घरे, दुकानांवर दगडफेक, जमावाला पांगवले
शाहू महाराज छत्रपती म्हणाले, कोल्हापुरात अशा घटना यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. जे घडलं ते योग्य नाही. सर्वांनी सलोख्याने राहिले पाहिजे. घडलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने तपास करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी सतर्क राहा, असंही शाहू महाराज म्हणाले.
'अगोदर संभाजीनगर नंतर अहिल्यानगर आता कोल्हापूरात या अशा घटना घडल्या याची लिंक शोधली पाहिजे, अशी मागणीही शाहू महाराज यांनी केली. राज्यात सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही शासनाची आणि त्यात गृह खात्याची असते. मी या घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शहरात शांतता आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेट्स मुस्लिम समाजातील दोन युवकांनी लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक देत छत्रपती शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन केले होते.
कोल्हापूर शहरात खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते गुरुवारी (८ जून ) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडित करण्याचे आदेश गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत.