यंदाच्या फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडूंचीच चलती, कोल्हापुरात के.एस.ए लीग स्पर्धेसाठी नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:46 AM2022-11-15T11:46:26+5:302022-11-15T11:46:46+5:30
यंदाचा फुटबाॅल हंगाम पूर्णपणे निर्बंधमुक्त होणार आहे
कोल्हापूर : यंदाच्या के.एस.ए. लीगसह विविध फुटबाॅल स्पर्धांत सोळा संघांकडून २२ परदेशी खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यामुळे फुटबाॅलप्रेमींना दर्जेदार खेळासोबत संघांमधील चुरस पाहता येणार आहे.
यंदाचा फुटबाॅल हंगाम पूर्णपणे निर्बंधमुक्त होणार आहे. त्यामुळे संघांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या संघांमध्ये परदेशी खेळाडूंसह देशातील नामांकित संघातील खेळाडूंनाही करारबद्ध केले आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम चुरशीचा व फुटबाॅलप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. चार वर्षांपूर्वी ईचीबेरी, ओबे, आदी परदेशी खेळाडूंनी शाहू स्टेडियम गाजविले होते. त्यांच्या खेळीला स्थानिक फुटबाॅलप्रेमींनीही मोठी दाद दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी कोल्हापूकरांना मिळणार आहे.
संघातील परदेशी खेळाडू असे, दिलबहार तालीम मंडळ (अ) - ईम्यानुअल ईचीबेरी, संडे ओबेम (दोघेही नायजेरिया), संयुक्त जुना बुधवार पेठ- रिचमोंड अवेटी, डोमिनिक्यू दादे (दोघेही घाना), खंडोबा तालीम मंडळ- अबुबकर अलहसन (नायजेरिया), मायकल सेफ (घाना), शिवाजी तरुण मंडळ -करीम मुरे (नायजेरिया), कोफी कोएसी (कोटा डायव्हरी), सम्राटनगर स्पोर्टस् क्लब- एडी स्टीफन (नायजेरिया), किलेणी डायमंडे (कोटा डायव्हरी), झुंजार क्लब - टाॅमस गोम्स, कार्लोस नाला (गुन्हेयु बिसाऊ),
उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम - कोनाना कोपी (कोटा डायव्हरी), ओलूमायडी एडीवले (नायजेरिया), पाटाकडील तालीम मंडळ (अ) - ॲड्र्यु ओगोचे (नायजेरिया), व्हिक्टर जॅक्सन (नायजेरिया), बालगोपाल तालीम मंडळ - केल्विन माॅम, व्हिक्टर विगवे (नायजेरिया), बी.जी.एम. स्पोर्टस्- हमीद बालोगन (नायजेरिया), दुबसी ऑपरा (नायजेरिया), प्रॅक्टिस क्लब (अ) - जुलैस थ्रोह (कोटा डायव्हरी), चिमा इनोसेंट (नायजेरिया).
देशातील नामांकित खेळाडू असे
प्रमोदकुमार पांडे, मुंबई (दिलबहार), अब्दुला अन्सारी, नागपूर ( संयुक्त जुना बुधवार पेठ), किमरन फर्नांडीस, गोवा (शिवाजी तरुण मंडळ), तरुणकुमार, हरयाणा (सम्राटनगर ), निवृत्ती पवनजी, बेळगाव (झुंजार क्लब), सोहेल शेख, सांगली (उत्तरेश्वर वाघाची तालीम), मोहम्मद खान, मुंबई (पाटाकडील-अ), परमजित बागेत, हरयाणा (बालगोपाल), फ्रान्सिस संगमा, नागालँड (बी.जी.एम.), सुमित भंडारी, फ्रांकी डेव्हीड, प्रतीक साबळे, पुणे (ऋणमुक्तेश्वर), अमित बिश्वास, पश्चिम बंगाल (प्रॅक्टिस), निनाद चव्हाण, ठाणे, विकी गौतम, बेळगाव (रंकाळा तालीम) यांचा समावेश आहे.