महाबळेश्वरला पर्यटकांची कसून तपासणी, हंगाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:18 PM2018-10-08T12:18:25+5:302018-10-08T12:47:59+5:30
जागतिक किर्तीच्या महाबळेश्वरमध्ये दसरा-दिवाळी पर्यटन हंगामास सुरूवात होऊ लागली आहे. पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असतानाच पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. सतरा प्रकारचे कागदपत्रे दाखविताना पर्यटकांचे हाल होत असून निसर्ग पाहायचा का कागदपत्रेच सांभाळायची असा प्रश्न विचारला जात आहे.
महाबळेश्वर : जागतिक किर्तीच्या महाबळेश्वरमध्ये दसरा-दिवाळी पर्यटन हंगामास सुरूवात होऊ लागली आहे. पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असतानाच पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. सतरा प्रकारचे कागदपत्रे दाखविताना पर्यटकांचे हाल होत असून निसर्ग पाहायचा का कागदपत्रेच सांभाळायची असा प्रश्न विचारला जात आहे.
महाबळेश्वरच्या दृष्टीने दसरा, दिवाळी हंगाम महत्वाचा समजला जातो. शहर परिसरात या लाखो पर्यटक दाखल होण्यास सुरूवात झालेली आहे. यामध्ये शाळेच्या सहली येतात. यामध्ये गुजरात राज्यातून सर्वाधिक शालेय सहली येतात. कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगाना राज्यातून चारचाकी वाहनांचा आवक वाढलेला असतो.
महाराष्ट्रातील दुचाकी व चारचाकी वाहने दाखल होताच पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक नाक्यावरती गाडी अडविली जाते. कागदपत्रे दाखवा, किती प्रवाशी आहेत, कोठे चालला अशी विचारणा केली जाते.
पाचगणी टोल नाका , महाबळेश्वर टोलनाका, माखरिया गार्डन, बाळासाहेब ठाकरे चौक, महाड नाका, श्रीक्षेत्र महाबळेश्वर नाक्यापर्यंत जाताना महाबळेश्वर फिरण्यास आलो आहे की अतिरेकी आहोत असा प्रश्न पर्यटकांना पडतो.