म्हाकवेतील त्या झाडांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:58+5:302021-04-09T04:25:58+5:30
म्हाकवेः म्हाकवे-आणूर रस्त्यावरील झाडे तोडण्यासाठी वनविभागाने म्हाकवे ग्रामपंचायतीला दिलेली परवानगी अखेर मागे घेण्यात आली. तसा लेखी आदेश वन अधिकारी ...
म्हाकवेः म्हाकवे-आणूर रस्त्यावरील झाडे तोडण्यासाठी वनविभागाने म्हाकवे ग्रामपंचायतीला दिलेली परवानगी अखेर मागे घेण्यात आली. तसा लेखी आदेश वन अधिकारी एस.व्ही. सोनवले यांनी म्हाकवे ग्रामपंचायतीला दिला आहे. त्यामुळे येथील पर्यावरणप्रेमींंच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून म्हाकवे-कुरणी रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू आहे. म्हाकवे येथील बसस्थानक परिसरात लिंब,चिंच, पिंपळ आदी झाडे आहेत. चिंचेच्या झाडाखाली प्रवाशांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीने पारकट्टाही बांधला आहे. मात्र,रुंदीकरणाच्या नावाखाली या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्याचा डाव ग्रामपंचायतीने आखला होता. तो उधळण्यात यश आल्याचेही पर्यावरणप्रेमींनी सांगितले. २३मार्च रोजी ही झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायतीला परवानगी मिळाली होती.
यासाठी सुनील देवडकर, प्रदीप पाटील,पंढरीनाथ पाटील, प्रवीण पाटील, अक्षय कुंभार यांनी पाठपुरावा केला.
‘अनेक वर्षांपासून गावच्या वैभवात भर घालणारी ही झाडे सुस्थितीत आहेत.यामुळे बसस्थानकातील प्रवाशांना सावली मिळते. त्यामुळे या झाडांची कत्तल होऊ नये. या हेतूनेच पाठपुरावा सुरू आहे.
- सुनील देवडकर
ग्रामस्थ, म्हाकवे