क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

By भीमगोंड देसाई | Published: August 10, 2024 12:45 PM2024-08-10T12:45:16+5:302024-08-10T12:48:35+5:30

विधानसभेपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा, २९ ऑगस्टला पुढील दिशा स्पष्ट करणार

Those who defeat the Marathas will not survive in the state Warning by Manoj Jarange Patil | क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठीच्या लढयाला प्रतिसाद मिळत नाही. लोक कमी होत आहेत, काहीजण हिणवत आहेत. पण क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, सग्या सोयऱ्याच्यांची अंमलबजावणी करावी मागणीसाठी पुढील भूमिका अंतरवाली सराटीतील २९ ऑगस्टच्या मेळाव्यात जाहीर करू, असे सूचक विधानही त्यांनी केले.

जरांगे- पाटील काल, शुक्रवारपासून (दि.९) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज, दौऱ्याच्या सांगताप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जरांगे- पाटील म्हणाले, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्यांमध्ये निष्ठा ठासून भरली आहे. त्यामुळे मी दहा लोक असो किंवा दहा लाख मी तिथे जातोच. पूर, केशवराव भोसले नाट्यग्रह जळीत प्रकरण अशा विविध कारणांमुळे कोल्हापूरच्या दौऱ्यात मराठा कमी होते. पण माझ्या सभेला उपस्थित होते, त्यापेक्षा अधिक लोक मला प्रत्यक्ष भेटून गेले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा घेवून कोल्हापुरातही मराठ्यांची ताकद दाखवून देणार आहे.

..यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर 

मराठा आणि कुणबी एकच आहेत. पण राजकारणी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. रक्तसंबंध आणि सगेसोयरे यामध्ये मोठा फरक आहे. रक्तसंबंधात मराठयांमध्ये लग्न होत नाहीत. सग्या सोयऱ्यामध्ये होतात. सग्यासोयऱ्यामध्ये कागदोपत्री पुरावा नसलेल्या मराठ्यांनाही कुणबीचा दाखला मिळणार आहे. हे सरकारलाही माहित आहे. यामुळे सरकार आता फुल्ल अडचणीत आले आहे. म्हणून काही लोकांना पुढे करून सगेसोयरे आणि रक्तसंबंध एकच आहे, असा समज पसरवत आहे. यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर आहे.

Web Title: Those who defeat the Marathas will not survive in the state Warning by Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.