‘अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:00 AM2017-07-24T04:00:40+5:302017-07-24T04:00:40+5:30

शेतकऱ्यांची चळवळ राष्ट्रीय पातळीवर पोहोचली असताना विनाकारण आणि तेही अचानकपणे माझ्यावर टीका करण्यामागील रघुनाथदादा पा

'Those who sleep on the beach will take a napkin' | ‘अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ’

‘अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांची चळवळ राष्ट्रीय पातळीवर पोहोचली असताना विनाकारण आणि तेही अचानकपणे माझ्यावर टीका करण्यामागील रघुनाथदादा पाटील यांचा हेतू समजला नाही. माझे आयुष्य खुले पुस्तक आहे, कोणाला काय वाटत असेल तर प्राप्तीकर विभागाकडे तक्रार करावी, असे रोखठोक सांगत बिनबुडाचे आरोप करून कोणी संघटना बदनाम करत असेल तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
सुकाणू समितीच्या मेळाव्यानंतर रविवारी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी, ‘नाव स्वाभिमानी आणि उद्योग बेईमानी’ अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांच्यावर केली होती. त्यावर मी फकीर माणूस आहे, कोणी अंगावर आले तर शिंगावर घेण्यासही मागे पुढे पाहत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: 'Those who sleep on the beach will take a napkin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.