रजिस्टरमध्ये खाडाखोड करणाऱ्यांची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:51+5:302021-08-26T04:25:51+5:30

इचलकरंजी : पालिकेतून सेवानिवृत्त होऊन सहा महिने झाले तरी सेवानिवृत्तपूर्व ३०० दिवसांचा अर्जित रजेचा पगार जमा झाला नाही. याबाबत ...

Those who tamper with the register should be investigated | रजिस्टरमध्ये खाडाखोड करणाऱ्यांची चौकशी करावी

रजिस्टरमध्ये खाडाखोड करणाऱ्यांची चौकशी करावी

Next

इचलकरंजी : पालिकेतून सेवानिवृत्त होऊन सहा महिने झाले तरी सेवानिवृत्तपूर्व ३०० दिवसांचा अर्जित रजेचा पगार जमा झाला नाही. याबाबत लेखा विभागाकडे विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रस्ताव यादीमध्ये नाव नसल्यामुळे रक्कम दिली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, धनादेश रजिस्टरवर नाव व अर्जित रजेचा पगार असल्याचे आढळून आले. तसेच त्यामध्ये खाडाखोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे लेखा विभागाने अन्याय केला असून, रजिस्टरमध्ये खाडाखोड करणाऱ्याची रीतसर चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश ठिकणे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात, सुरेश ठिकणे हे २८ फेब्रुवारी २०२१ ला सेवानिवृत्त झाले. फंडाची रक्कम, उपदान, शिल्लक हक्काच्या रजेचा पगार आणि पेन्शन मिळावी म्हणून पालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार फंड, पेन्शन व उपदान रक्कम जमा झाली. मात्र, सेवानिवृत्तीपूर्व चार लाख ३५ हजार २४० रुपये जमा झाले नाहीत. रजिस्टर यादीत १ जानेवारी २०१९ ते ३१ जुलै २०२१ पर्यंतच्या पालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रक्कम अदा झाली. मात्र, रजिस्टर यादीत नाव असताना माझ्यावर अन्याय केला आहे. या बाबी नजरचुकीने झाल्या नसून, मुद्दामहून करण्यात आल्या आहेत. तरी रजिस्टरमध्ये खाडाखोड करणाऱ्याची रीतसर चौकशी करून कारवाई करावी. तसेच देय रक्कम मिळवून देऊन न्याय द्यावा, असे म्हटले आहे.

Web Title: Those who tamper with the register should be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.