शाहू महाराजांचे विचार आजही कालसंगत : पुष्पा भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:22 AM2018-06-26T00:22:03+5:302018-06-26T04:30:09+5:30

देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे

 Thoughts of Shahu Maharaj are still relevant today: Pushpa Bhave: The King took care of all the people from Dalits to Muslims | शाहू महाराजांचे विचार आजही कालसंगत : पुष्पा भावे

शाहू महाराजांचे विचार आजही कालसंगत : पुष्पा भावे

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात अघोषित आणीबाणी! राजकीय पक्षांना दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हावे लागेल

समीर देशपांडे  
कोल्हापूर : देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे ओळखून लढाईची तयारी ठेवावी, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.

प्रा. भावे यांना यंदाचा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार आज, मंगळवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर येथे सायंकाळी सहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, अशा परिस्थितीमध्ये निराशा दाटून येते, परंतु माणसं खाली मान घालून हे सहन करताहेत अशातला भाग नाही. जो तो ज्याला शक्य तितका विरोध करतो आहे. मात्र, राजकीय पक्ष विशिष्ट मूल्यांच्या आधारे याविरोधात ठामपणे उभे राहत नाहीत हे वास्तव आहे. असे काम करणाऱ्यांना शक्ती देण्याची भूमिका इतर पक्षांना घ्यावी लागेल.

जातीयवादाबाबत बोलताना प्रा. भावे म्हणाल्या, एका बाजूला तरुणाईचा एक गट जातिनिर्मूलनासाठी काम करतो आहे, तर दुसरीकडे असाच गट आपल्या अस्मितेचा प्रश्न म्हणून जातीला घट्ट धरून बसला आहे. हिंसाचाराचाही विषय महत्त्वाचा आहे. भाजप सत्तेत आल्यापासून अनेकजण हिंसेमध्ये लडबडलेले दिसून येतात. महाराष्ट्राबाहेर गोवंशहत्याबंदीवरून अनेकजण हिंसेवर उतरल्याची उदाहरणे आहेत.

महिलांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करून त्या म्हणाल्या, अशा घटनांमध्ये कमी वयाच्या मुलांचा असलेला सहभाग आणि वंचित वर्गातील मुलांची वाढती संख्या हे देखील चिंतेचे आणखी एक कारण आहे. कायद्याने या सर्व गोष्टी थांबतील असं मी मानत नाही. गुन्हे होतील त्याबाबत कायदा आपले काम करेल; पण मानसिकता बदलण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातूनच ठामपणे आपल्याला पुढे जावे लागेल. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गातील मुला-मुलींना डॉक्टर किंवा इंजिनिअर करताना जर कर्जे काढावी लागत असतील, तर सर्वसामान्यांसाठी हे शिक्षण आवाक्याबाहेरचेच ठरते. कितीही घोषणा होत असल्या तरी मुस्लिम आणि दलितांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही हे वास्तव आहे.

शेतकऱ्याला उपाशी ठेवूनआपण काय खाणार?शेतीचा आणि शेतकºयांचा खेळखंडोबा चाललेला आपण रोज पाहत आहोत. याबाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी यावर चिंतन करण्याची गरज आहे. शेतकºयाला उपाशी ठेवून आपण काय खाणार आहोत? हा साधा विचार आपल्या मनाला कसा शिवत नाही? असा सवाल यावेळी प्रा. भावे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती नाही
कोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक आहे असे वाटते, या प्रश्नावर सध्या तरी तसे काही दिसत नसल्याचे स्पष्ट मत प्रा. भावे यांनी व्यक्त केले. याआधीचा महाराष्ट्र काही बाबतीत तरी वेगळा वाटत होता, परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे अशी परिस्थिती आता राहिली नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करून कर्नाटक पोलीस गुन्हेगारांपर्यंत जातात, परंतु नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा असा तपास का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शाहू महाराजांनी करवीर संस्थानमध्ये जे क्रांतिकारी निर्णय राबविले, ते दूरदृष्टीचे होते. दलितांपासून ते मुस्लिमांपर्यंत अनेकांची काळजी या राजाने घेतली होती. त्यांचीच धोरणे, त्यांचा विचार आता आधुनिक काळाशी सुसंगत बनवून पुढे न्यावा लागेल.
- पुष्पा भावे, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत


 

Web Title:  Thoughts of Shahu Maharaj are still relevant today: Pushpa Bhave: The King took care of all the people from Dalits to Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.