फुलेवाडीत ६९ हजाराची घरफोडी, दोघा संशयीतांवर गुन्हा : चोरीत रोकड, दागिन्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:33 PM2019-03-28T14:33:52+5:302019-03-28T14:34:42+5:30
फुलेवाडी इंगवले कॉलनीत सुमारे ६९ हजाराची घरफोडीचा प्रकार घडला. यामध्ये रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर : फुलेवाडी इंगवले कॉलनीत सुमारे ६९ हजाराची घरफोडीचा प्रकार घडला. यामध्ये रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, वैजयंती संग्रामसिंह कुपटे (रा. प्लॉट नं. ४७ रा. इंगवले कॉलनी, फुलेवाडी ) हे सहकटुंब बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यामध्ये चोरट्याने १ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील दोन टॉप्स, मंगळसुत्र एक जुवाकिस असा सुमारे ४९ हजार रुपये किंमतीचे दागिणे व रोख २० हजार रुपये असा एकूण ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत वैजयंती कुपटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत रेखा वसंतराव कुपटे व अमरनाथ वसंतराव कुपटे (दोघेही रा. प्लॉट नं. ११२/१५ बालिंगा पाडळी, ता, करवीर) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पण याबाबत कोणालाही अटक केलेली नाही.