हजारो भाविकांनी जोतिबाच्या देवदर्शनाने केला वर्षारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 04:22 PM2023-01-01T16:22:16+5:302023-01-01T16:22:37+5:30

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांनी तीर्थ क्षेत्री भेटी दिल्या .

Thousands of devotees started the year with Jotiba's Devdarshan kolhapur | हजारो भाविकांनी जोतिबाच्या देवदर्शनाने केला वर्षारंभ

हजारो भाविकांनी जोतिबाच्या देवदर्शनाने केला वर्षारंभ

googlenewsNext

दत्तात्रय धडेल
जोतिबा : जोतिबा डोंगरावर वर्षारंभीच्या रविवारी भाविकांची जोतिबा दर्शना साठी  लांबच लांब लागली दर्शन रांग लागली होती. जोतिबा देवाचा वार, वर्षाचा पहिला दिवस रविवार , सलग सुट्टीच्या त्रिवेणी योगामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली .

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांनी तीर्थ क्षेत्री भेटी दिल्या . जोतिबा डोंगरावर वर्षाचा पहिला रविवार आणि पहिला दिवस असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली . येणारे नुतन वर्ष कोरोना मुक्त व सुख समुद्धीचे जावो अशी प्रार्थना  देवासमोर करीत होते . सकाळ पासुनच दर्शनाच्या लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या . मंदिर बाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शन रांग लागली होती . 

एकाच दरवाज्यातुन मंदिर प्रवेशामुळे उत्तर दरवाज्यावर मोठी गर्दी झाली होती . जोतिबा देवाची नवीन वर्षारंभी निमित्त आकर्षक पुजा बांधली होती . सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला .भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून चांगभलं चा गजर केला . पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती . वाहनाच्या घाटमार्गातून रांगा लागल्या होत्या .

Web Title: Thousands of devotees started the year with Jotiba's Devdarshan kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.