बॅँका बंदमुळे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Published: February 21, 2017 11:47 PM2017-02-21T23:47:06+5:302017-02-21T23:47:06+5:30

इचलकरंजी शहर : पूर्वघोषणा नाही, हजारोंहून अधिक धनादेशांचे समाशोधन बंद

Thousands turnover of bank | बॅँका बंदमुळे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

बॅँका बंदमुळे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

Next

इचलकरंजी : कोणतीही पूर्व घोषणा नसताना मंगळवारी शहरातील राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँका बंद राहिल्या. परिणामी, दररोज धनादेशाद्वारे होणारी सुमारे १५० कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली. तीन सहकारी व दोन राष्ट्रीयीकृत अशा पाच बॅँका मात्र दुपारपर्यंत सुरू होत्या.
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे शहर असल्यामुळे दररोज येथे सूत खरेदी व कापड विक्री करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोलकाता अशा परपेठांमध्ये येथून विक्री केलेले कापड जात असते, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, सिल्वासा, गुजरात, आदी राज्यांतून इचलकरंजीत सूत येत असते. अशा सुताची व कापडाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल रोज होते.
नोटाबंदी झाल्यापासून सूत व कापडाच्या खरेदी-विक्रीमध्ये होणारे रोखीचे व्यवहार बंद झाले असून, धनादेशाद्वारे होणाऱ्या खरेदी-विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी, १५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केवळ धनादेशाद्वारे होत असल्याची माहिती सूत व कापड व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. मंगळवारी अचानक बॅँका बंद राहिल्याने हजारोंहून अधिक धनादेशांचे समाशोधन झाले नाही. भारतीय स्टेट बॅँकेच्या येथील शाखेमध्ये होणारे समाशोधन बंद राहिल्याने त्याचा १५० कोटींचा फटका वस्त्रनगरीला बसला आहे. (प्रतिनिधी)


ग्राहक धास्तावले
चालू आठवड्यामध्ये २४, २५ व २६ फेब्रुवारीला सलग सुट्या आल्यामुळे आणि मंगळवारी अचानक सुटी पडल्याने आज, बुधवारी व उद्या गुरुवारी बॅँकांमध्ये गर्दी होणार आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने त्यादिवशी पगाराची रक्कम काढण्याबाबत यंत्रमागधारकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Thousands turnover of bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.