स्वतःला सिद्ध करण्याची धमक मायबोलीत : प्रदीपकुमार पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:51+5:302021-03-01T04:27:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : बदलत्या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्या मायबोलीतच असते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : बदलत्या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्या मायबोलीतच असते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील यांनी केले. अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी विभागप्रमुख नवनाथ शेरखाने, दिलीप चरणे व विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
सुनील कावळे, विजया पाटील, सुनंदा ठवरे उपस्थित होते. नवनाथ शेरखाने यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी डोंगरे हिने सूत्रसंचालन केले. रवींद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.
२८ अंबप राजेंद्र हायस्कूल
फोटो ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये राजभाषा मराठी दिन कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील.