सेवानिवृत्तीनंतरही कर्तृत्व फुलवण्याची धमक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:09+5:302021-07-07T04:31:09+5:30

पेरणोली : सेवानिवृत्तीनंतर आयुष्याचे नियोजन करत असताना सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. त्यासाठी सेवानिवृत्तीनंतरही कर्तृत्व फुलवण्याची धमक ठेवा, असे ...

Threaten to flourish even after retirement | सेवानिवृत्तीनंतरही कर्तृत्व फुलवण्याची धमक ठेवा

सेवानिवृत्तीनंतरही कर्तृत्व फुलवण्याची धमक ठेवा

Next

पेरणोली : सेवानिवृत्तीनंतर आयुष्याचे नियोजन करत असताना सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. त्यासाठी सेवानिवृत्तीनंतरही कर्तृत्व फुलवण्याची धमक ठेवा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी केले.

आजरा येथील श्री. रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीतर्फे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.

चौगुले म्हणाले, निवृत्तीनंतर संवाद, मित्रमंडळी वाढवा व ऋणानुबंध जोपासा. पैशाचे योग्य नियोजन करा व मिळालेला पैसा नातेवाइकांच्या नावावर न ठेवता स्वत:च्या नावावर ठेवा. गरजूंना मदत करत आयुष्यात आनंद वाढविण्याचा प्रयत्न करा.

संस्थापक चौगुले म्हणाले, संस्थेत राजकारणविरहित कारभार केल्यास संस्था निश्चित वाढते. संस्था वाढवताना स्नेह वाढविण्याबरोबरच विश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे.

या वेळी सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याध्यापक विष्णू जाधव, आजरा महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर शिवाजी पारपोलकर, आजरा ‘अर्बन’चे शाखाधिकारी मारुती कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रा. दत्ता पाटील, जाधव, कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, प्रा. रामचंद्र निळपणकर, नूरजहाँ सोलापुरे, रेखा पोतदार, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव, बाळकृष्ण दरी, रमेश कारेकर, शाखाधिकारी उत्तम दळवी आदी उपस्थित होते.

शाखाध्यक्ष प्रा. डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत केले. मीना रिंगणे यांनी सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य राजीव टोपले यांनी आभार मानले.

फोटो ओळी : आजरा येथील रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे मुख्याध्यापक विष्णू जाधव यांचा सत्कार करताना प्रा. डॉ. एस. एस. चौगुले. शेजारी एम. एल. चौगुले, विनायक आजगेकर, राजीव टोपले, नूरजहाँ सोलापुरे, शिवशंकर उपासे, रामचंद्र निळपणकर, दत्तात्रय मायदेव आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०६०७२०२१-गड-०३

Web Title: Threaten to flourish even after retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.