गलथान नियोजनाने दक्षिण भाग तहानलेला
By admin | Published: January 9, 2016 01:04 AM2016-01-09T01:04:41+5:302016-01-09T01:25:39+5:30
कळंबा, पाचगावच्या पाणीपुरवठ्याची समस्या : बोगस कनेक्शन, पाणीगळती, फुटक्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष
अमर पाटील -- कळंबा पावसाचे घटलेले प्रमाण, पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामे, कळंबा तलावातील गाळ उठावाकडे झालेले दुर्लक्ष, फुटक्या जलवाहिन्या, बोगस नळकनेक्शन यामुळे दरवर्षी उन्हाळ््यापूर्वीच कळंबा, पाचगाव, उपनगरांचे पाण्याचे गणित बिघडत आहे. मर्यादित पाणीसाठा व पाण्याची प्रचंड मागणी यांची सांगड घालताना पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाचे नाकीनऊ येते.पाणी प्रश्नाकडे होणाऱ्या दुर्लक्षाने वित्तीय तूटही सहन करावी लागते. शिवाय नागरिकांच्या रोष्याला सामोरे जाताना प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची धांदल उडते. नियोजनशून्य कारभाराच्या गणिताची उकल त्या प्रश्नातच आहे.
पालिका पाणीपुरवठा विभागाने उपनगरातील बोगस नळकनेक्शन्सची झाडाझडती घेतली तरी पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होईल. फुलेवाडी-रिंगरोड प्रभागात हजारांवर बोगस कनेक्शन असून जुना वाशिनाका ते टिंबर मार्केटमध्येही बोगस कनेक्शनचा सुळसुळाट आहे. बेसुमार पाणी वापराचा फटका अन्य नागरिकांना बसतो. हे एका प्रभागाचे चित्र उपनगरातील बऱ्याच प्रभागांसह कळंबा, पाचगावात याहून वेगळे चित्र नाही. उपनगरांत वाढती अपार्टमेंट, हॉटेल्स, दवाखाने, शाळा, गृहसंकुल योजनांमध्ये नियमबाह्य मोठ्या जाडीच्या नळांची कनेक्शन हितसंबंध जोपासून दिली आहेत.
व्यथा
उपनगरांची