अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:09 PM2018-07-30T12:09:54+5:302018-07-30T12:12:09+5:30

लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे.

Threatened women by threatening obscene photos, married couple married in Delhi | अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

Next
ठळक मुद्देअश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

कोल्हापूर : लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, बिहार येथील युवतीचे आई-वडील कामानिमित्त अनेक वर्षांपासून कोल्हापुरात आले आहेत. ते शिरोली एम. आय. डी. सी. येथील कारखान्यात काम करतात. पीडित युवती वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.

दीड वर्षापूर्वी नातेवाइकाच्या लग्नामध्ये तिची संशयित धर्मेंद्र निषाद याच्याशी ओळख झाली. यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर या दोघांचे मोबाईलवर बोलणे व व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज होऊ लागले.

लग्नामध्ये संशयिताने आपल्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी फोटो काढले होते. ते फोटो अश्लील बनवून तुझ्या घरातील लोकांना दाखवितो. तुझ्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने माथेरान येथे नेऊन एका हॉटेलमध्ये दोन दिवस अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार कोल्हापूरला येऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करू लागला.

पीडित युवतीला त्याचे लग्न झाले असून, त्याचा पाच मुले असल्याचे समजताच धक्का बसला. तिने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. तिला दिलासा देत त्यांनी शाहूपुरी पोलिसांत येऊन संशयितांविरोधात फिर्याद दिली. संशयित गुंड प्रवृत्तीचा असल्याने गेल्या दीड वर्षापासून युवती त्याचा अत्याचार सहन करीत होती.

असा सापडला जाळ्यात

पीडित युवतीने व तिच्या आई-वडिलांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची भेट घेऊन अत्याचाराची माहिती दिली. संशयित युवतीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करीत होता. त्यानुसार त्याला कोल्हापूरला येण्यास सांगितले. तो नेहमीप्रमाणे रविवारी कोल्हापुरात आला. येथील एका हॉटेलवर उतरल्यानंतर युवतीला मॅसेज केला. त्यानंतर पोलिसांनी युवतीची फिर्याद घेऊन तत्काळ हॉटेलवर जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
 

 

Web Title: Threatened women by threatening obscene photos, married couple married in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.