सुरेश गडगे यांच्याकडून धमकी दाखवून दबाव; नगररचना विभागाचे म्हणणे : फौजदारी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:12+5:302021-03-04T04:44:12+5:30
कोल्हापूर : हातकणंगले येथील विठ्ठलराव नाईक-निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतिम मंजुरी रेखांकन प्रस्ताव न्यायप्रविष्ठ आहे. रेखांकनामधील रस्ता वापरास ...
कोल्हापूर : हातकणंगले येथील विठ्ठलराव नाईक-निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतिम मंजुरी रेखांकन प्रस्ताव न्यायप्रविष्ठ आहे. रेखांकनामधील रस्ता वापरास वादी यांना प्रतिबंध करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. भ्रष्टाचारविरोधी जन-क्रांती आघाडीचे अध्यक्ष सुरेश गडगे हे त्रयस्थ व्यक्ती असून धमकी देऊन दबाव टाकत आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी यापूर्वीच केल्याची माहिती, नगररचनाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गडगे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना ८ फेब्रुवारी पत्र पाठविले आहे. सहाय्यक संचालक गायकवाड यांना १ मार्च २०२१ पूर्वी सेवेतून बडतर्फ न केल्यास २ मार्चला मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. ही गृहनिर्माण संस्था गटनंंबर ६४२ अ हातकणंगले येथील अंतिम मंजुरी रेखांकन मंजुरी प्रस्ताव इचलकरंजीतील दिवाणी न्यायालयात रेग्युलर दिवाणी दावा ( क्र.216/2016 दि.08/11/2019) रोजीचे आदेश पाहता व गाव नकाशा, प्रादेशिक योजना नकाशा व शासनाने कलम २० अन्वये मंजूर विभाग बदलांमधील अटींचे अनुषंगाने रेखांकनांमध्ये काही दुरुस्ती करणे आवश्यक असल्याबाबत या कार्यालयाने इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांना कळविले आहे. याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका प्रलंबित आहे. त्यामध्ये २२ जानेवारी २०२१ ला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ही वस्तुस्थिती माहिती असूनही गडगे हे अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरून तक्रारी करत आहेत.