खवल्या मांजर तस्करप्रकरणी तीन आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:09+5:302021-04-20T04:26:09+5:30
आजरा तालुक्यातील सुळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खवल्या मांजर सापडले होते. या खवल्या मांजराची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला ...
आजरा तालुक्यातील सुळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खवल्या मांजर सापडले होते. या खवल्या मांजराची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. व त्या ठिकाणी स्वतः ग्राहक बनून सहा कोटी रुपयांचा खवले मांजर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तस्करांना याचा सुगावा लागल्यानंतर वनविभागाचे अधिकारी रोहन भाटे यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला. व पाठलाग करुन त्यांच्याकडून खवल्या मांजर काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्या दिवसापासूनच वनविभागाने तीन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली होती. दुसऱ्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. तर आज प्रमोद पांडुरंग पताडे ( वय ३५ रा. किणे ) अमर नारायण कानडे (वय ४० रा. शिरसंगी) व युवराज रानोजी शिंदे ( वय २१ रा. उंबरवाडी ) या तिघांना भरारी पथकाकडून अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली व एक चार चाकी डस्टर गाडी जप्त केली आहे.