क्रिकेटचे बेटिंग घेणार्या तिघांना अटक दीड लाखाचा माल जप्त : ताराबाई पार्कात गुन्हे शाखेची कारवाई
By admin | Published: May 15, 2014 12:55 AM2014-05-15T00:55:59+5:302014-05-15T01:03:13+5:30
कोल्हापूर : येथील गुरव मळा, ताराबाई पार्क येथील तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये आयपीएल क्रिकेटच्या रॉयल चॅलेंजर्स
कोल्हापूर : येथील गुरव मळा, ताराबाई पार्क येथील तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये आयपीएल क्रिकेटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्याचे मोबाईलवर लोकांकडून बेटिंग घेणार्या तिघा तरुणांना काल, मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित जवाहर रामचंद्र चंदवाणी (वय ५०, रा. ताराबाई पार्क), लखन श्रीचंद चुगानी (२४, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर), महेश रामचंद्र आहुजा (३८, रा. न्यू शाहूपुरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, गुरव मळा, ताराबाई पार्क येथील जवाहर चंदवाणी हा स्वत:च्या फ्लॅटमध्ये क्रिकेटचे बेटिंग घेत असल्याची माहिती खबर्याद्वारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहकार्यांसमवेत तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये छापा टाकला असता संशयित चंदवाणी, लखन चुगानी व महेश आहुजा हे तिघे मोबाईलवरून क्रिकेट बेटिंग चालवीत असताना रंगेहात मिळून आले. यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम तीन हजार, १२ मोबाईल, कॅलक्युलेटर, लॅपटॉप, मोटारसायकल, पॅड, बेटिंगचे आकड्याचे कागद असा सुमारे १ लाख ३३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या सर्वांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)