गंजीमाळ येथील हल्लाप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:59+5:302021-04-12T04:21:59+5:30
कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट, गंजीमाळ परिसरातील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ...
कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट, गंजीमाळ परिसरातील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांवर कारवाई केली. त्यापैकी तिघांना अटक केली असून, ओंकार विनोद जाधव (वय २४), विशाल सचिन जाधव (२२, दोघेही रा. मार्केट यार्ड) व तानाजी धोंडीराम कोळपटे (वय २३, रा. नृसिंह कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
गंजीमाळ परिसरात दुचाकीचा सायलेन्सर काढून मोठ्या आवाजात वाहन पळवल्याप्रकरणी जाब विचारण्यावरून गंजीमाळ येथे शनिवारी सायंकाळी वादावादी झाली होती. त्यातून परिसरातील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातील साहित्याची नासधूस करुन चांदीची मूर्ती चोरुन नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर विरोधी गटानेही पूर्ववैमनस्यातून वाद करत तलवार हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दिली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस नाईक संदीप पाटील यांनी रविवारी सायंकाळी ओंकार जाधव, तानाजी कोळपटे आणि विशाल जाधव या तिघा संशयितांना अटक केली तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.