मुख्य सूत्रधार कुमार कांबळेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:09+5:302021-02-08T04:22:09+5:30

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे राजकीय वादातून झालेल्या संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. भीमराज भवनजवळ, कबनूर) याच्या ...

Three arrested, including chief facilitator Kumar Kamble | मुख्य सूत्रधार कुमार कांबळेसह तिघांना अटक

मुख्य सूत्रधार कुमार कांबळेसह तिघांना अटक

googlenewsNext

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे राजकीय वादातून झालेल्या संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. भीमराज भवनजवळ, कबनूर) याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व ग्रामपंचायत सदस्य

कुमार मारुती कांबळे (वय ४२) याच्यासह तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी चारच्या सुमारास अटक केली.

संकेत ऊर्फ अनिकेत अनिल शिंदे (वय १९) व राकेश ऊर्फ आकाश अनिल शिंदे (वय २०), तिघे रा. सिद्धार्थनगर, कबनूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कबनूर येथील मुजावर पट्टी परिसरात २३ जानेवारी रोजी संदीपचा राजकीय वादातून खून झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कुमार कांबळे याच्यासह 14 जनांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील आठ जणांना यापूर्वी अटक केली आहे. मुख्य सूत्रधार कुमार कांबळे हा फरार होता. त्याने अटकपूर्व जमीन मंजूर होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जमीन फेटाळला. घटनेनंतर कांबळे हा एसटीने प्रवास करत ठिकठिकाणी फिरत होता. तसेच तो मंदिरामध्ये वास्तव्यास होता अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. रविवारी तो हातकणंगले येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवार चारच्या सुमारास कांबळेसह दोन सख्ख्या भावांना अटक केली.

या प्रकरणातील आणखीन काही संशयित आरोपी फरार आहेत.

Web Title: Three arrested, including chief facilitator Kumar Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.