केर्लीत सिमेंट कारखान्यातील चोरीप्रकरणी तिघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:23+5:302021-05-17T04:24:23+5:30
कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी ...
कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी साहित्य चोरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी तिघा तरुणांना अटक केली. अवधूत परशराम पिष्ठे (वय २०), प्रशांत बबन पाटील (२१ दोघेही रा. केर्ली, ता. करवीर), केतन वसंत भोसले (२२ रा. वडणगे, ता. करवीर) अशी अटक केलल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमर दिनकर दाबाडे (वय ५८, रा. जुना बुधवार पेठ) यांच्या मालकीचा केर्ली येथे सिमेंट पाईप काँक्रीट वर्क कारखाना आहे. रविवारी (दि. ९) मध्यरात्री त्या कारखान्यातील सिमेंट पाईप निर्माण करण्यासाठी लागणारा सहा एमएम जाडीचा तारेचा बंडल, चेन ब्लॉक, आर्थिंगची वायर असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरुन नेला. त्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद झाला होता. करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तपास करत अवधूत पिष्ठे, प्रशांत पाटील, केतन भोसले या तिघांना संशयावरुन अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील काही मुद्देमालही जप्त केला आहे. ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पो.नि. संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पो. नि. विवेकानंद ताकभाते व हे कॉ. श्रीकांत पाटील यांनी केली.
फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी)
फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)
फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)
===Photopath===
160521\16kol_30_16052021_5.jpg~160521\16kol_31_16052021_5.jpg~160521\16kol_32_16052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी) फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)~फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी) फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)~फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी) फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)