लक्षतीर्थ वसाहत मारहाण प्रकरणी तिघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:52+5:302021-09-08T04:29:52+5:30
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून डोक्यात बांंबू मारून युवकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी ...
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून डोक्यात बांंबू मारून युवकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री तिघांना अटक केली. चंद्रकांत ऊर्फ चंदर अप्पाजी दफडे (वय ४५), सागर विठ्ठल दफडे (२२), बाळू ऊर्फ बाळकू अप्पाजी दफडे (४०, सर्व रा. सासणे कॉलनी, धनगरवाडा, लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यमकर व दफडे हे दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या शेजारी राहतात. चंद्रकांत दफडे हा नेहमी यमकर व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत होता. त्याबद्दल संजय जनू यमकर (वय ४०) हा त्यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्याला धक्काबुक्की केली. यावेळी वडिलांना सोडवण्यासाठी आलेला मुलगा विशाल यमकर याला संशयीत दाफडे यांनी पकडून ठेवून त्याच्या डोक्यात बांबू मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी सोमवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीसांनी तिघा संशयितांना अटक केली.