कळंबा कारागृहात मोबाईल वापरप्रकरणी ‘मोक्का’ कारवाईतील तिघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:37+5:302021-03-09T04:28:37+5:30
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील वादग्रस्त मोबाईलप्रकरणी पोलिसांनी ‘मोक्का’ कारवाईतील तिघांना अटक केली. युवराज मोहनराव महाडिक (वय ३६, रा. २९९, ...
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील वादग्रस्त मोबाईलप्रकरणी पोलिसांनी ‘मोक्का’ कारवाईतील तिघांना अटक केली. युवराज मोहनराव महाडिक (वय ३६, रा. २९९, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर), शुक्रराज पांडुरंग घाडगे (३५, रा. तुपारी, ता. पलूस, जि. सांगली), अभिमान विठ्ठल माने (३४, रा. सुभाषनगर टाकळी, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आणखी काही कैद्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा मध्यवर्ती कारागृहाची भक्कम सुरक्षा यंत्रणा भेदून आतील कैद्यापर्यंत मोबाईल पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या महिन्यात कैद्यांच्या अंगझडतीत एक मोबाईल सापडला होता. त्या बराकमधील किती कैद्यांनी तो मोबाईल वापरला त्याबाबत चौकशी सुरू होती. त्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासण्यात आले, त्यानुसार तो मोबाईल वापरल्याप्रकरणी यापूर्वी नीलेश राणे या कैद्याला अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीत आणखी काही जणांनी या मोबाईलवर संभाषण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कारागृहातील अंडा बराकमध्ये ‘मोक्कां’तर्गत कारवाईत असणारे युवराज महाडिक, शुक्रराज घाडगे, अभिमान माने या तिघांचा जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहातून ताबा घेऊन त्यांना अटक केली.
फोटो नं. ०८०३२०२१-कोल-युवराज महाडिक (आरोपी)
फोटो नं. ०८०३२०२१-कोल-शुक्रराज घाडगे (आरोपी)
फोटो नं. ०८०३२०२१-कोल-अभिमान माने (आरोपी)