पिस्तूलसह तिघांना अटक
By admin | Published: August 15, 2015 12:04 AM2015-08-15T00:04:21+5:302015-08-15T00:04:21+5:30
संशयित पेठवडगावचे : लक्ष्मीपुरी पोलिसांची नाकाबंदीवेळी कारवाई
कोल्हापूर : शिवाजी पूल येथे लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे नाकाबंदी केली होती. यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीच्या पिस्तूलसहीत ९ एम.एम.चे जिवंत राऊंडचे मॅगझिन आणि तीन मोबाईलसह २ लाखांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी सतीश सिद्धेश्वर तोरगलकर (वय ४७, रा. मु. पो. घुमट गल्ली, पेठवडगाव, ता. हातकणंगले), राजू सर्जेराव जाधव (३४, रा. कैकाडी गल्ली, पेठवडगांव), संदीप प्रकाश माने (१९, रा. अंबाबाई मंदिराजवळ, पेठवडगांव, हातकणंगले) या तिघांना बेकायदेशीर, बिगर परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली
शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीत शिवाजी पूल येथे गुन्हे शोधपथकातील सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व त्यांचे सहकारी अजिज शेख, भारत कांबळे , राहुल देसाई, विलास किरुळकर, अजित वाडेकर, विनायक फराकटे, संदीप कापसे, अभिजित व्हरांबळे, उदय काटकर, साजिद शिकलगार, सविता पानसरे हे नाकाबंदी करून गस्त घालत असताना रत्नागिरी रोडने शहरात येणाऱ्या दोन मोटारसायकलवरील तिघांना अडविले. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांच्या एका पिस्तुलाबरोबर ९ एम.एम. जिवंत राऊंड ८ नग, एक रिकामी मॅगझिन, १५ हजार किमतीचे तीन मोबाईल, ८० हजार किमतीची दोन दुचाकी वाहने असा एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल सापडला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, तिघांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार बेकायदेशीरपणे, बिगरपरवाना कब्जात बाळगणे, विक्रीसाठी हाताळणी करणे आदींनुसार कारवाई करण्यात आली. त्यातील राजू जाधवच्या विरोधात वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.