चोरी प्रकरणी तिघे अटकेत: १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:05+5:302021-07-03T04:17:05+5:30

पेठवडगाव : येथील एका कारखान्यातील कॉपर वायर चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडून चोरीचा माल जप्त ...

Three arrested in theft case: 1 lakh items seized | चोरी प्रकरणी तिघे अटकेत: १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चोरी प्रकरणी तिघे अटकेत: १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Next

पेठवडगाव : येथील एका कारखान्यातील कॉपर वायर चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी किरण जालिंदर पवार (रा. कोल्हापूर रोड, पेठवडगाव), प्रशांत अप्पासाहेब पाटील (रा. संभाजीनगर सावर्डे), संजय श्रीपती चव्हाण (रा. बीरदेव चौक वठार तर्फ उदगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत संतोष राजाराम आंबेकर उचगाव यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वडगाव-कोल्हापूर रस्त्यावर डी. एन. विंड सिस्टीम इंडिया या वर्कशॉपमधील ९ जून व २५ जूनला अज्ञाताने जुन्या १ लाख ४० हजारांची ३५० मीटर कॉपर केबल चोरीस गेल्याची तक्रार वडगाव पोलिसात नोंद झाली होती. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तपास पथके तैनात केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी शिताफीने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच ९० हजार रुपये किमतीची केबल, गुन्हात वापरलेली मोटरसायकल, दोन मोबाईल फोन असा एक लाख १४ हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस नाईक अमरसिंह पावरा, दादा माने, योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, रणवीर जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणला.

●फोटो कॅप्शन पेठवडगाव : वडगाव पोलिसांनी कारखान्यातील काॅपर वायरची चोरी उघडकीस आणली. यामध्ये जप्त केलेला मुद्देमाल, तपास कर्मचारी. (छाया सुहास जाधव)

Web Title: Three arrested in theft case: 1 lakh items seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.