आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:37 AM2019-10-01T11:37:29+5:302019-10-01T11:39:12+5:30
संभाजीनगर-गंजीमाळ येथे घरात वृद्धा आजारी असल्याने होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण केली. मारुती बाळू कांबळे (वय ६५) त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित अनिकेत पंडीत कांबळे, त्याचा भाऊ विशाल कांबळे, उषा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : संभाजीनगर-गंजीमाळ येथे घरात वृद्धा आजारी असल्याने होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण केली. मारुती बाळू कांबळे (वय ६५) त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित अनिकेत पंडीत कांबळे, त्याचा भाऊ विशाल कांबळे, उषा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, मारुती कांबळे यांची वृद्ध आई आजारी आहे. त्यांच्या शेजारी राहणारा अनिकेत कांबळे याने मोठ्या आवाजात होम थिएटर लावला होता. त्याचा त्रास आईला होत असल्याने कांबळे यांनी अनिकेतला होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितले.
त्यावेळी अनिकेतचा भाऊ विशाल बाहेर आला, आवाज कमी करणार नाही, असे सांगून तिघांनी शिवीगाळ करून लोखंडी सळी मारुती कांबळे यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.