तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार!

By संदीप आडनाईक | Published: December 4, 2018 04:17 AM2018-12-04T04:17:46+5:302018-12-04T04:18:06+5:30

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याजवळील कामशेतजवळ तीन अंधांसह पाच जणांनी पॅराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली.

Three blind five-year-old wind! | तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार!

तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार!

googlenewsNext

- संदीप आडनाईक 

कोल्हापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याजवळील कामशेतजवळ तीन अंधांसह पाच जणांनी पॅराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली. कामशेतच्या परिसरात प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड आणि निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्समार्फत या साहसी उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रेरणाचे प्रमुख सतीश नवले यांनी १0 वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती. तिला निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्सचे संजय राव यांनी पाठबळ मिळाल्यानंतर मूर्त स्वरूप आले.
कोल्हापूरचे सतीश नवले, पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन अंधांनी पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने जवळपास १000 फूट उंचीवर पाच तास विहरण्याचा आनंद घेत दिव्यांग दिवस साजरा केला. त्यांच्यासोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या डोळस व्यक्तींनी होत्या. या साहसी उपक्रमासाठी निर्वाणाचे रवी शेलार, विनोद आणि बाळू या पायलटनी साहाय्य केले.
सकाळी ८.३0 वाजता त्यांनी पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने पहिली झेप घेतली. दुपारी १.३0 वाजेपर्यंत सर्वांनी या साहसाचा अनुभव घेतला. लेफ्ट आणि राईट कंट्रोल कसे करायचे, वॉकी टॉकीचा वापर, तसेच वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्वप्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगांनी हा थरार अनुभवला.
.हवेत झेप घेण्याची गंमत आम्ही अनुभवली. काही मर्यादा होत्या; पण आम्हा दृष्टिदिव्यांगांना पॅराग्लायडिंगची भीती वाटली नाही. अशा साहसी उपक्रमात सहभागी झाल्याने उलट आमचा आत्मविश्वास वाढला.
- सतीश नवले, प्रमुख, प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड

Web Title: Three blind five-year-old wind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.