तिघा कॉन्स्टेबलची तडकाफडकी उचलबांगडी : सुहेल शर्मा यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:27 AM2017-11-22T01:27:02+5:302017-11-22T01:27:02+5:30

कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

 Three constables picking up fast: Suhail Sharma's action | तिघा कॉन्स्टेबलची तडकाफडकी उचलबांगडी : सुहेल शर्मा यांची कारवाई

तिघा कॉन्स्टेबलची तडकाफडकी उचलबांगडी : सुहेल शर्मा यांची कारवाई

Next
ठळक मुद्देअवैध व्यावसायिकांशी सलगीचा ठपका

एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. कॉन्स्टेबल विजय देसाई (लक्ष्मीपुरी), जुबिन शेख (जुना राजवाडा), मिलिंद नलवडे (राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यासंबंधीचे आदेश मंगळवारी रात्री दिले. पोलीस दलात पहिल्यांदा अशा प्रकारे झालेल्या कठोर कारवाईने खळबळ उडाली आहे.

खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डिटेक्शन ब्रँच- डीबी पथक) आहे. या पथकात काम करणारे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्णांची उकल न करता स्वत:चे हित जपत रुबाब मिरविताना दिसतात. अंगात कडक इस्त्रीचे कपडे, पायांमध्ये किमती बूट, तर डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल अशा पोशाखात वावरणारे हे ‘कलेक्टर’ वादग्रस्त ठरत आहेत.

वर्षभरात पोलीस दलातील डझनभर कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची अशा भ्रष्ट कर्मचाºयांच्या वर्तनामुळे नाचक्की झाली. हप्तावसुली जोरात सुरू झाल्याने अवैध व्यवसाय फोफावले. यावर नियंत्रण ठेवायचे कोणी? असा प्रश्न कोल्हापूर पोलीस दलात होता. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर ही जबाबदारी सोपवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शर्मा यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत कलेक्टरांची यादी मिळवून त्यांच्यावर गेले दोन महिने टेहळणी ठेवली होती. विजय देसाई, जुबिन शेख, मिलिंद नलवडे यांच्या कामकाजाची शहानिशा केली असता त्यांची अवैध व्यावसायिकांशी सलगी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मंगळवारी रात्री सातच्या सुमारास वायरलेसवरून निरोप धाडत या तिघांना ‘आहे त्या स्थितीत पोलीस मुख्यालयात हजर राहण्या’चे आदेश दिले. त्यानुसार ते रात्रीच हजर झाले

सातजणांचा समावेश
शहरातील अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असणाºयांमध्ये सात कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यांपैकी तिघांची तडकाफडकी बदली झाली. उर्वरित चौघांची चौकशी सुरू असून येत्या दोन दिवसांत त्यांचीही उचलबांगडी होणार आहे.

Web Title:  Three constables picking up fast: Suhail Sharma's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.