चोवीस तासात ऑनलाइनद्वारे तीन कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:15+5:302021-03-21T04:22:15+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत शहरातील पाणीपट्टी थकबाकी भरणा न केलेल्या ५४ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडित ...

Three crore payment online in 24 hours | चोवीस तासात ऑनलाइनद्वारे तीन कोटींचा भरणा

चोवीस तासात ऑनलाइनद्वारे तीन कोटींचा भरणा

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत शहरातील पाणीपट्टी थकबाकी भरणा न केलेल्या ५४ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडित करण्यात आली तर एक कोटी १३ लाख ९३ हजार ९४७ रुपयांची वसुली करण्यात आली. मागच्या आठ दिवसांतील ही कारवाई आहे. तर मागच्या चोवीस तासात ऑनलाइन सुविधेद्वारे तीन कोटी २६ लाख ४६ हजार ६६१ इतक्या रकमेचा भरणा झाला.

पाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत असलेल्या पाच वसुली पथकामार्फत १ एप्रिल २०२० ते १९ मार्च २०२१ या कालावधीमध्ये ४१९ नळ कनेक्शन खंडित केले असून, चार कोटी ९७ लाख १३ हजार १३९ रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे.

तसेच स्पॉट बिल स्पॉट कलेक्शन अंतर्गत १ एप्रिल २०२० ते १८ मार्च २०२१ या कालावधीत एकूण २१ हजार १४९ नागरिकांनी चार कोटी तीन लाख तीन हजार ७५८ इतकी पाणीपट्टी भरली.

वसुली झालेले शासकीय विभाग -

- पोलीस विभाग - ११ लाख ८२ हजार ३८२

- सार्वजनिक बांधकाम विभाग - चार लाख ८६ हजार ५९३

- कळंबा मध्यवर्ती कारागृह - ३ लाख २८ हजार

- बिंदू चौक उपकारागृह - ६४ हजार ३३०

- रेल्वे विभाग - ३१ लाख ५९ हजार

पाणीपट्टी वसुलीची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता नारायण भोसले, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, शांताराम पोवार, पी.एस. माने, अमर बागल, संजय पाटील यांनी भाग घेतला.

Web Title: Three crore payment online in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.