गुरुजींच्या बॅँकेत सव्वा तीन कोटींची उधळपट्टी
By Admin | Published: February 5, 2015 12:10 AM2015-02-05T00:10:10+5:302015-02-05T00:13:44+5:30
प्राधिकृत अधिकाऱ्यांचा अहवाल : संचालक मंडळ बरखास्तीची विरोधकांची मागणी
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांनी विविध बाबींवर सव्वा तीन कोटींची उधळपट्टी केल्याचा अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिला असून त्यानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शिक्षक बॅँक बचाव संयुक्त कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत केली. सत्तारुढ गटाने निवडणुकीनंतर पहिल्या वर्षी पारदर्शक कारभाराचा आव आणला, त्यानंतर खरे दात दाखविण्यास सुरुवात केली. संचालक मंडळाच्या कामकाजाविरोधात आम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. त्यानुसार करवीरचे साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे व शहर उपनिबंधक रंजन लाखे यांनी चौकशी केली. त्यामध्ये पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी काय दिवे लावलेत, हे स्पष्ट होते. रिझर्व्ह बँकेच्या धोरणालाच तिलांजली देत तरलता राखण्याकडे दुर्लक्ष केल्याने २ लाख ४ हजारांचा दंड झाला. कोअर बॅँकिंगचा व्यवहार करताना निविदा न मागवताच कारभार केला. रिझर्व्ह बॅँकेची मनाई असताना लाभांश वाटप केले,असे ठपके ठेवले आहेत. या चौकशी अहवालात सव्वा तीन कोटींची उधळपट्टी संचालकांनी केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील व कृष्णात कारंडे यांनी केली. बॅँकेपेक्षा कमी सभासद व व्यवहार कमी असताना जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा नफा २ कोटी ४० लाख रुपये होतो, मग शिक्षक बँकेचा फक्त २५ लाख नफा कसा? असा सवाल करत सत्तारुढ गटाने गेले पाच वर्षांत आपले दात दाखविले असून बचाव समितीच्या माध्यमातून सत्तारुढ गटाला उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा प्रसाद पाटील यांनी दिला. बॅँकेच्या हिताचे कारण पुढे करत बँक कर्मचाऱ्यांचे पगार ४ ते ५ हजारांनी गोठवले आणि दुसरीकडे उधळपट्टी करायची? ही कसली हुकुमशाही, असा सवाल बाळासो पोवार यांनी केला.
दोन वेळा रस्ते प्रकल्पाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा अहवाल बाहेर आलाच नाही. आता नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता असल्याने विरोध केला. आताच्या समितीमध्ये महापालिका व आर्किटेक्ट असोसिएशनचा प्रतिनिधी घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकन समितीचे स्वागत करू. आणखी काही काळ वाट पाहण्याची तयारी आहे. समितीला कृती समिती सहकार्य करील, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी स्पष्ट केले.
रस्ते प्रकल्पाबाबत सर्व माहिती घेतली आहे. मूल्यांकनाच्या सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत शहरवासीयांवर भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेऊ.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त