पदवीधर नोंदणीसाठी उरले तीनच दिवस
By admin | Published: August 29, 2014 12:20 AM2014-08-29T00:20:44+5:302014-08-29T00:32:40+5:30
आठ हजार नोंदणी : अधिसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया
कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघातून शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर २०१५ मध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आज, गुरुवारअखेर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे आठ हजार पदवीधरांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठीची अंतिम मुदत रविवार (दि. ३१) पर्यंत आहे.
या निवडणुकीसाठी आॅगस्ट २०१४ अखेर पदवीधर नोंदणी यादीत नोंद केलेल्या पदवीधरांची मतदार यादी महाराष्ट्र विद्यापीठे कायदा कलम ९९ (५) अनुसार तयार केली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पदवीधर नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत सुमारे आठ हजार पदवीधरांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अधिसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पदवीधरांना नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या पदवीधरांनी आपली नावे यापूर्वी विद्यापीठाच्या पदवीधर नोंदणी यादीत नोंद केली आहेत, ती यादी विद्यापीठाच्या ँ३३स्र://ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल या संकेतस्थळावर ‘रजिस्ट्रेशन आॅफ ग्रॅज्युएट्स’ या लिंकवर ठेवली आहे. त्यात नाव असल्यास अशा उमेदवारांनी पुन्हा नावनोंदणी करण्याची गरज नाही. (प्रतिनिधी)
‘सुटी’दिवशी विभाग सुरू
दि. ३१ आॅगस्टला रविवार असल्याने कार्यालयास सुटी आहे. तरीदेखील पदवीधर नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रकाशन विभाग, कॅश विभाग, आवक-जावक विभाग आणि सभा विभाग कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.