बालकांना न्युमोनियापासून वाचविण्यासाठी तीन डोस आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:46+5:302021-07-19T04:17:46+5:30
तुरंबे : एक वर्षाच्या आतील बालकांना न्युमोनियापासून वाचविण्यासाठी तीन डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ...
तुरंबे : एक वर्षाच्या आतील बालकांना न्युमोनियापासून वाचविण्यासाठी तीन डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे तीन डोस द्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती सौ. वंदना अरुण जाधव यांनी केले.
प्राथमिक आरोग्य पथक तुरंबे (ता. राधानगरी) येथे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेप्रसंगी जाधव बोलत होत्या. यावेळी वंदना जाधव, माजी उपसभापती अरुण जाधव, वनीता पाटील, पंचायत समिती सदस्या सुशिला भावके यांच्याहस्ते लसीकरणाला सुरुवात झाली.
यावेळी सभापती वंदना जाधव म्हणाल्या, न्युमोकोकल व न्युमोनिया हे श्वसनमार्गाला होणारे संसर्ग आहेत. ज्यामुळे फुफ्फुसाला सूज येते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. यातून ऑक्सिजन कमी पडल्याने खोकला व धाप लागणे असे त्रास उद्भवतात. परिणामी मुले बेशुद्ध होऊ शकतात. शासनाने लहान मुलांच्या आरोग्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लहान बालकांचे आरोग्य जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बालकांना तीन डोस द्यावेत. यावेळी ज्येष्ठ नेते शामराव भावके, सरपंच सौ. मयुरी भावके, पंचायत समिती सदस्या सुशिला भावके, उपसभापती वनीता भरत पाटील, वैद्यकीय अधिकारी स्वाती चौगुले, वर्षाराणी मुंडाशे, मनोज कोटकर, प्राची बोटे, सागर भावके, आर. बी. पाटील, कृष्णात गुरव आशा आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
फोटो ओळी
तुरंबे येथील प्राथमिक आरोग्य पथकात बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव यांच्याहस्ते लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच मयुरी भावके, पंचायत समिती सदस्या सुशिला भावके, माजी उपसभापती अरुण जाधव, वनीता पाटील, सागर भावके.