तीन शेतकरी युरोप दौऱ्यावर
By admin | Published: July 27, 2014 12:44 AM2014-07-27T00:44:08+5:302014-07-27T01:15:16+5:30
शेती, दुग्ध व्यवसाय व फळांचे मार्केट या विषयीची माहिती घेणार
कोल्हापूर : जिल्ह्णातील तीन शेतकरी आधुनिक शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी युरोपला रवाना झाले. दहा दिवसांच्या दौऱ्यात ते शेती, दुग्ध व्यवसाय व फळांचे मार्केट या विषयीची माहिती घेणार आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा काढला जातो. यंदा राज्यातून ४२ शेतकऱ्यांची निवड युरोप दौऱ्यासाठी केली. कोल्हापूर जिल्ह्णातून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे (करवीर), ‘गोकुळ’चे संचालक दीपक भरमू पाटील (चंदगड) व रामचंद्र भोगम (करवीर) यांची निवड झालीे. जर्मनी, आॅस्ट्रिया, स्विर्त्झलॅँड व नेदरलॅन्ड या युरोप खंडातील देशात प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांची निवड केली. युरोप खंडात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायातील येथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर आपल्याकडे करावा. २५ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान हा दौरा होणार असून खाडे, पाटील व भोगम हे रवाना झाले.
बाळासाहेब खाडे यांना परदेश दौऱ्यासाठी सांगरुळ (ता. करवीर) येथील विविध संस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शशिकांत म्हेतर, उपसरपंच बाळासाहेब यादव, पंडितराव तोरस्कर, भगवानराव लोंढे, नानासाहेब कासोटे, एन. डी. खाडे, बी. डी. खाडे, भिवाजी नाळे, सहदेव खाडे, सचिन लोंढे, अरुण खाडे, एन. जी. खाडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)