कोल्हापूर शहरातील तीन पेट्रोल पंप बंद ; वाहनधारकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:48 PM2019-02-21T15:48:11+5:302019-02-21T15:50:05+5:30
कोल्हापूर शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
शहरातील दसरा चौक येथील स्टेशनरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हेमाडे पेट्रोलपंप अपुऱ्या जागेमुळे तीन वर्षापुर्वी बंद करणाऱ्या आला. तर त्याच मार्गावरील लक्ष्मी स्टोअर्स पेट्रोलपंप हाही १४ महिन्यांपुर्वी जागेचा करार संपल्याने बंद करण्यात आला.
या पंपात दिवसाकाठी ५ हजार लिटर पेट्रोल, तर ३ हजार लिटर डिझेल विक्री होत होती. तर बसंत बहार, असेंब्ली रोडवरील गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असणारा दामोदर शिवराम कंपनीचाही पेट्रोल पंप जागेच्या कारणावास्तव बंद करण्यात आला आहे.
या पंपातून दिवसाकाठी साडेसहा हजार लिटर पेट्रोलची विक्री केली जात होती. गेल्या तीन वर्षात एकापाठोपाठ तीन पेट्रोल पंप बंद झाल्याने या मार्गावरील वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
भारत पेट्रोलियम कंपनीच्या आमच्या पंपातून दररोज पाच हजार लिटर पेट्रोल विक्री केली जात होती. जागेच्या कारणावास्तव सध्या हा पंप बंद ठेवण्यात आला आहे.
- राजाराम कनोजे,
व्यवस्थापक, लक्ष्मी स्टोअर्स पेट्रोल पंप