तीन ग्रामपंचायती बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 02:40 PM2019-03-21T14:40:40+5:302019-03-21T14:42:30+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर आठ थेट निवडणूकीव्दारे रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आठ ठिकाणी रविवारी (दि.२४)ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे.

Three Gram Panchayats uncontested, polling for eight Gram Panchayats in Kolhapur district on Sunday | तीन ग्रामपंचायती बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

तीन ग्रामपंचायती बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देतीन ग्रामपंचायती बिनविरोधआठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर आठ थेट निवडणूकीव्दारे रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आठ ठिकाणी रविवारी (दि.२४)ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे.

चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द येथे एकही नामनिर्देशन प्राप्त नसल्यामुळे सरपंच पद रिक्त राहिले आहे. थेट सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने चंदगड तालुक्यातील कोरज, राधानगरी तालुक्यातील सावर्डे-पाटणकर, आजरा तालुक्यातील आवंडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

त्यामुळे उर्वरित पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडीरत्नागिरी, काळजवडे व पिसात्री अशा तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि पन्हाळा तालुक्यातील गिरोली, शिरोळ तालुक्यातील चिंचवाड, कागल तालुक्यातील बाचणी, राधानगरी तालुक्यातील कारीवडे रिक्त असलेल्या सरपंच पदांचीपोट निवडणूक रविवारी (दि. २४ ) ला होत असून मतमोजणी सोमवारी (दि.२५) होत आहे.

मतमोजणीची ठिकाणे पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी पन्हाळा तहसिलदार कार्यालय येथे मतमोजणी होईल. राधानगरीतील ग्रामपंचायतींसाठी तहसिलदार कार्यालय येथील लक्ष्मीसागर सभागृह, शिरोळ तालुक्यातील मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकिय इमारत येथे , कागल तालुक्यातील मतमोजणी तहसिलदार कार्यालय येथे होणार आहे.

निवडणुकीत आता मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

लोकसभा निवडणुकीचे मतदान लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने रविवारी (दि.२४) होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.
 

 

Web Title: Three Gram Panchayats uncontested, polling for eight Gram Panchayats in Kolhapur district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.