Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:14 PM2023-08-30T14:14:06+5:302023-08-30T14:15:18+5:30

अपहरण, दरोडा गुन्ह्यातील आरोपी हातकणंगले आणि आटपाडीचे

Three kg gold, two and a half crore cash looted; 10 years hard labor for 7 accused in kolhapur | Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext

कोल्हापूर : लक्ष्मी गोल्ड बुलियनच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडील तीन किलो सोने आणि दोन कोटी ५२ लाख एक हजार २०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी (दि. २९) दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ४० हजार ५०० रुपयांचा दंड सुनावला. राजेंद्रनगर येथे अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा जून २०१९ मध्ये घडला होता.

लक्ष्मण अंकुश पवार (वय २९, रा. खटके वस्ती, लिंगिवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाजी तानाजी नंदीवाले (वय २९, रा. तमदलगे, ता. शिरोळ), अविनाश बजरंग मोटे (वय २९), अक्षय लक्ष्मण मोहिते (वय २९), इंद्रजीत बापू देसाई (वय २५, तिघे रा. हातकणंगले), राजीव ऊर्फ झुमऱ्या बळीराम कदम (वय २८) आणि संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय ३१, दोघे रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील आठवा आरोपी सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची) हा फरार आहे.

सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १४ जून २०१९ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास राजेंद्रनगर रिंगरोड येथे लक्ष्मी बुलियनच्या कर्मचाऱ्यांची कार अडवली. कारवर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कार बांबवडेच्या दिशेने नेऊन कारमधील रोकड आणि सोने काढून घेतले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्ह्याचा तपास करून सात संशयितांना अटक केली. न्यायालयात १८ साक्षीदार तपासण्यात आहे. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी सात आरोपींना शिक्षा सुनावली. ॲड. गजानन कोरे, पैरवी अंमलदार अशोक शिंगे, नजराना देसाई, विशाल तळेकर, सागर माने यांची खटल्याच्या कामकाजात मदत झाली.

दरोड्याची दहशत अन् शिताफीने तपास

लक्ष्मी बुलियनच्या कारवर धाडसी दरोडा पडल्यानंतर सराफ बाजारात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करून दरोडेखोरांना पकडले. त्यांच्या विरोधातील ठोस पुरावे गोळा केल्यामुळे आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा झाली.

Web Title: Three kg gold, two and a half crore cash looted; 10 years hard labor for 7 accused in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.