कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी

By उद्धव गोडसे | Published: August 10, 2023 06:36 PM2023-08-10T18:36:41+5:302023-08-10T18:36:58+5:30

मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले

Three minor girls were abducted and sexually assaulted from Kolhapur, two accused were sentenced to five years of hard labour | कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी

कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी

googlenewsNext

कोल्हापूर : कॉलेजमधील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने दोन आरोपींना जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोषी ठरवले. गुरुवारी (दि. १०) दोन्ही आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१८ मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण करून इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. 

हर्षल आनंदा देसाई (वय २४, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय २४, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.

सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोन नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपींनी या मुलींना महावीर गार्डन येथे बोलवून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दुस-या दिवशी मुलींच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते कोल्हापुरातील एका सराफाला विकले. त्यातून आलेल्या पैशातून मद्यप्राशन करून आणि गांजा ओढून पुन्हा मुलींचा लैंगिक छळ केला. तीन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दाखल झाली. तत्कालीन पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांनी मोबाइल लोकेशनवरून मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील कुलकर्णी यांनी न्यायालयात १९ साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे आणि ॲड. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी शिक्षा सुनावली. कॉन्स्टेबल धोंडीराम शिंदे आणि माधवी घोडके यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Three minor girls were abducted and sexually assaulted from Kolhapur, two accused were sentenced to five years of hard labour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.