सर्व प्रकारच्या लघुउद्योजकांचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:29+5:302021-07-28T04:24:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : आधीच अडचणीत असलेला वस्त्रोद्योग कोरोनामुळे दोन वर्षांपासून ठप्प आहे. आता महापुराचे संकट उभे राहिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आधीच अडचणीत असलेला वस्त्रोद्योग कोरोनामुळे दोन वर्षांपासून ठप्प आहे. आता महापुराचे संकट उभे राहिले आहे. राज्य शासनाने घेतलेल्या विविध सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सर्व प्रकारच्या लघुउद्योजकांचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून कोरोना व महापुरामुळे राज्यातील वस्त्रोद्योग अडचणीत सापडला आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग ५० टक्के महाराष्ट्रात आहे. या उद्योगाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलतींचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. तरी प्रलंबित प्रस्तावांना शासन निर्णयाप्रमाणे त्वरित अनुदान देऊन पूरग्रस्त परिस्थितीत नुकसान झालेल्या सर्व प्रकारच्या लघु उद्योजकांचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे.