शिवाजी विद्यापीठात तीन नव्या इमारतींची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:01 PM2019-09-14T12:01:50+5:302019-09-14T12:07:29+5:30

शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

Three new buildings added to Shivaji University | शिवाजी विद्यापीठात तीन नव्या इमारतींची भर

शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी उभालेल्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून डी. टी. शिर्के, अमित कुलकर्णी, देवानंद शिंदे, संजय जाधव, विलास नांदवडेकर, राहुल चिकोडे, पंकज मेहता, आदी उपस्थित होते.  

Next
ठळक मुद्देरसायनशास्त्र अधिविभाग, दोन वसतिगृहांचा समावेशचंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागासाठी नूतन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत मुलींच्या वसतिगृहाची इमारत आणि संशोधक विद्यार्थी वसतिगृहासाठी इमारत अशा एकूण तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतींचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत तळमजल्याचे ८१६.२९ चौरस मीटर क्षेत्रफळाइतके बांधकाम पूर्ण झाले आहे.

संशोधक विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीचे तळघर अधिक तळमजला असे बांधकाम विद्यापीठाच्या स्वनिधीमधून करण्यात आले आहे. एकूण १२९१.०२ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एकूण १०० संशोधक विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होणार आहे.

इमारतींच्या उद्घाटन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, लोबाजी भिसे, सिनेट सदस्य पंकज मेहता, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संजय परमाणे, व्यवस्थापन परिषद सदस्य राहुल चिकोडे, अमित कुलकर्णी, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. 

‘रुसा’चे अनुदान

‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत तीनमजली इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तळमजला विद्यापीठाच्या स्वनिधीतून, तर वरील दोन मजले राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अनुदानातून बांधण्यात आले आहेत. १३७१ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. येथे सुमारे १५० विद्यार्थिनींची निवास व्यवस्था आहे. सर्व इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Three new buildings added to Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.