‘रेमडेसिविर’ विक्रीप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:07+5:302021-05-11T04:26:07+5:30
कोल्हापूर : रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री प्रकरणी अटक केलेल्या तिघांच्या टोळीला न्यायालयाने दि. १३ ...
कोल्हापूर : रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री प्रकरणी अटक केलेल्या तिघांच्या टोळीला न्यायालयाने दि. १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सचिन दौलत जोगम (वय ३०, रा. कणेरकरनगर, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, धामोड, ता. राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे (२५, रा. मराठा बोर्डिंग हाऊस, दसरा चौक, कोल्हापूर, मूळ गाव- यल्लाम्मा चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), प्रकाश लक्ष्मण गोते (२५, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रुग्णालयातील रुग्णांना न वापरलेली रेमडेसिविर ही इंजेक्शने काळ्याबाजारात जादा दराने विक्री करत असल्याचे तिघांचे रॅकेट रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उघड केले होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन व साहित्य असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.