खून प्रकरणातील तिघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:00+5:302021-03-16T04:26:00+5:30
इचलकरंजी : येथील शांतीनगर खून प्रकरणातील अटक केलेल्या तिघा संशयिताना येथील न्यायालयात हजर केले असता, २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी ...
इचलकरंजी : येथील शांतीनगर खून प्रकरणातील अटक केलेल्या तिघा संशयिताना येथील न्यायालयात हजर केले असता, २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृत अजय अशोक कांबळे (वय ३२, रा. अंधेरी-मुंबई) येथील असून, तो हालोंडी व इंगळी (ता.हातकणंगले) येथील नातेवाइकांकडे आला होता. तो हालोंडीतून बेपत्ता झाल्याची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली होती.
अक्षय रावसाहेब कमतनुरे (२२), शक्ती शहाजी इंगळे (२१) व तेजस ऊर्फ सुशांत राजू गोरे (१९, सर्व रा. शहापूर, ता. हातकणंगले) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. अजय हा मिळेल तेथे हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे. तो काही दिवसांपूर्वी हालोंडी व इंगळी येथील नातेवाइकांकडे आला होता. हालोंडीतून दारू पिण्यासाठी माणगाव येथे आल्यानंतर तेथून या तिघांनी त्याला दारू देण्याच्या आमिषाने उचलले; परंतु त्याच्याकडून काढून घेण्यासाठी पैसे नसल्याने वाद घालत त्यातून त्याचा खून केला.