जोतिबारोड व शिवाजी रोडवरील तीन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:29+5:302021-05-05T04:37:29+5:30
कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात जोतिबा रोडवरील तीन दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरू ठेवल्याने त्यांची दुकाने महानगरपालिका परवाना विभागाच्यावतीने सोमवारी सील ...
कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात जोतिबा रोडवरील तीन दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरू ठेवल्याने त्यांची दुकाने महानगरपालिका परवाना विभागाच्यावतीने सोमवारी सील करण्यात आली. तर सात दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार धान्य लाईन, भाजी विक्रेते, बेकरी, किराणा दुकान, दूध विक्रेते यांनाच सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासन निर्देशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकामार्फत शहरात विविध ठिकाणी फिरती करुन दुकाने बंद असलेबाबत तपासणी केली जात आहे.
परंतु सोमवारी सकाळी धान्य लाईन, भाजी विक्रेते, बेकरी, किराणा दुकान, दूध विक्रेते यांच्या व्यतिरिक्त इतर व्यवसाय सुरू असल्याचे या भरारी पथकास निदर्शनास आले. यावेळी पहिल्यांदा सूचना देऊनही पुन्हा दुकान उघडे असल्याचे आढळल्याने स्वर्ग ज्वेलर्स, मनोज इलेक्ट्रीकल्स व होम ॲप्लायसेन्स ही तीन दुकाने सील करण्यात आली.
तसेच आईसाहेब महाराज पुतळा पसिरातील तथास्तु शॉपी मॉल (दंड पंधरा हजार), राजारामपुरी येथील मनमंदिर(आठ हजार रुपये दंड), करवीर क्रिएशन (पाच हजार दंड), गुजरी महादेव गल्लीतील जितेंद्र गर्डे यांचे ज्वेलर्सचे दुकान (पाच हजार दंड), आरोही क्रिएशन (दोन हजार दंड), जोतिबा रोडवरील महालक्ष्मी कलेक्शन (पाच हजार दंड) व महालक्ष्मी वस्त्रविहार (पाच हजार दंड) या सात दुकानदारांना सक्त ताकीद देऊन दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई इस्टेट अधिकारी सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख पंडित पोवार यांनी केली.