स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पन्हाळ्यास मानांकन, २० रोजी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:11 PM2020-08-17T20:11:48+5:302020-08-17T20:19:17+5:30

स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरल्यामुळे ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. याबद्दल २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे पत्र केंद्रीय नगरविकास कार्यालयाकडुन नगरपरिषदेस प्राप्त झाल्याचे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले. 

Three star rating to Panhala city due to garbage disposal campaign | स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पन्हाळ्यास मानांकन, २० रोजी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निमंत्रण

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पन्हाळ्यास मानांकन, २० रोजी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निमंत्रण

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणामध्ये पन्हाळ्यास मानांकन २० रोजी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निमंत्रण

पन्हाळा - स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरल्यामुळे ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. याबद्दल २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे पत्र केंद्रीय नगरविकास कार्यालयाकडुन नगरपरिषदेस प्राप्त झाल्याचे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा निकाल त्याच दिवशी नवी दिल्ली येथे जाहिर करणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी सांगितले की, पन्हाळ्यातील शंभर टक्के कचरा संकलन विलगीकरण प्रक्रिया करण्यात नगरपरिषद यशस्वी झाली. कचरा मुक्ती अभियानामुळे पन्हाळा शहरास थ्री स्टार मानांकन मिळाले आहे.  नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतची योग्य ती अवलंबजावणी करण्यात आली.

शहरातील नागरिक व पर्यटक यांना स्वच्छतेबाबतीत जनजागृती केल्यामुळे पन्हाळा शहरास थ्री स्टार मानांकन मिळाले असुन पहिला नंबर मिळेल अशी आशा आहे. याचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यआधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरपरिषदेची सर्व स्वच्छता कर्मचारी, सर्व नगरसेवक नगरसेविका, शहरातील नागरिक यांना आहे.

- रूपाली धडेल,
नगराध्यक्षा, पन्हाळा

Web Title: Three star rating to Panhala city due to garbage disposal campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.