ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:30 PM2020-12-28T20:30:02+5:302020-12-28T20:32:07+5:30

Grampanchyat Elecation Kolhpaur- सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.

Three thousand candidature applications were submitted for Gram Panchayat out of jealousy | ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी कृषी महाविद्यालय येथे करवीरमधील ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरताना ग्रामीण भागातील महिलांमध्येही अपूर्व उत्साह होता. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरण्यासाठी झुंबड

कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुुरू असून, ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी २६, गुरुवारी ५०० अर्ज आले; मात्र शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुकांची व समर्थकांची झुंबड उडाली होती. इच्छुकांसोबत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक असा गोतावळा आला होता.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन हजार ९५३ व्यक्तींनी तीन हजार ३७ अर्ज भरले. अशारीतीने तीन दिवसांत तीन हजार ४६९ इच्छुकांनी तीन हजार ५६३ अर्ज भरले आहेत.
 

Web Title: Three thousand candidature applications were submitted for Gram Panchayat out of jealousy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.