तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सापडल्या तीन हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती

By संदीप आडनाईक | Published: November 10, 2023 09:09 PM2023-11-10T21:09:30+5:302023-11-10T21:09:41+5:30

गगनबावडा, राधानगरीत वाढल्या नोंदी

Three thousand Kunbi records found in the district on the third day; District Administration Information | तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सापडल्या तीन हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती

तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सापडल्या तीन हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती

कोल्हापूर : कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी २ हजार ९३४ नोंदी नव्याने सापडल्या आहेत. नव्याने गगनबावडा पाठोपाठ राधानगरी तालुक्यात नोंदींमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत १४,१८४ नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात आढळल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तिसऱ्या दिवशी काेल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा निबंधक कार्यालयांतील नोंदवहीमध्येही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूल विभागाकडेच आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह कारागृह पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा विविध कार्यालयातील सर्व कर्मचारी कुणबी नोंदीसाठी रेकॉर्डस तपासत आहेत.

शुक्रवारी वाढल्या नोंदी

हातकणंगले : २३१(६६३)

राधानगरी : १२६८ (१५३९)

गगनबावडा : १४३१ (१५८३)

नव्याने आढळलेल्या नोंदी

महानगरपालिका : १
सह जिल्हा निबंधक वर्ग एक : ३

Web Title: Three thousand Kunbi records found in the district on the third day; District Administration Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.