आंबोलीत वर्षा पर्यटनाचे तीनतेरा
By admin | Published: July 22, 2014 10:56 PM2014-07-22T22:56:39+5:302014-07-22T23:16:10+5:30
मास्टर प्लॅनही बासनात : अवजड वाहतूक, अपुरे पोलीस बळ
अनंत जाधव - सावंतवाडी
आंबोलीतील वर्षा पर्यटन सुरू होण्याआधी पोलीस प्रशासन नेहमीच खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी ‘मास्टर प्लॅन’ तयार करीत असते. पण यावर्षी मास्टर प्लॅन सोडाच, जादा पोलीस कुमकही नसल्याने हंगामातील शेवटचा रविवार पर्यटकांसाठी डोकेदुखीचा ठरला. तब्बल १७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि सात तास वाहतूक कोंडी हे पोलिसांचे अपयशच मानावे लागेल.
आंबोली वर्षा पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा व बेळगाव या राज्यातील पर्यटकही येथे येतात. या वर्षी मात्र अपुरा आणि उशिराने आलेला पाऊस तसेच उशिराने वाहणारे धबधबे यामुळे पर्यटकांना अखेरचे दोन रविवारच वर्षा पर्यटनासाठी मिळाले होते. त्यात शेवटचा रविवार ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरवर्षी वर्षा पर्यटनात रविवारच्या दिवशी आंबोलीतून सावंतवाडीकडे येणारी अवजड वाहतूक नांगरतास नजीक उभी करून ठेवली जाते. तर सावंतवाडीतून आंबोलीकडे जाणारी वाहतूक दाणोलीत थांबविण्यात येते. या खबरदारीमुळे आंबोलीत सहसा वाहतूक कोंडी होत नाही.
मात्र, यावर्षी आंबोलीच्या वर्षा पर्यटनासाठी मास्टर प्लॅनच तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ओरोस येथून येणार की सावंतवाडीतीलच ठेवणार यापासूनच वर्षा पर्यटनाचे तीन तेरा वाजले. मध्येच वाहतूक कोडींही सोडवत होते. त्यातच दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आंबोलीत शेवटच्या रविवारी साधारणत: ८० ते ९० हजारांच्या घरात पर्यटक होते. यातील बहुतेक पर्यटक हे दुचाकी घेऊन आले होते. हे दुचाकीस्वार मिळेल तेथे दुचाकी घुसवित असल्याने पोलिसही वैतागले होते. त्यातच १७ ते १८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि तब्बल सात तास वाहतूक कोंडी यामुळे एक किलोमीटर अंतर जाण्यासाठीही एका वाहनाला तब्बल अडीच तास लागत होते.
४ आंबोली हे वर्षा पर्यटनातील राज्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. परंतु वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद पर्यटकांचा त्रास अनुभवल्यावर अनेक पर्यटक पुन्हा येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना झाल्यास रविवारसारखा प्रकार पुन्हा घडणार नाही.
पार्किंगची सोय होणे गरजेचे
४ आंबोली वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गाड्या रस्त्यानजीक कुठेही पार्किंग करून पर्यटनाचा आनंद लुटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास इतर पर्यटकांना सोसावा लागतो. पार्किंगची योग्य सोय केल्यास यातून बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्तावही केला आहे. पण कदाचित मुहूर्त मिळत नसल्याने आणि त्यातच वनविभाग खोडा घालत असल्याने पार्किंगसारखे अनेक प्रश्न धूळखात पडले आहेत.