स्वच्छता अभियानात तीन टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:06+5:302020-12-28T04:14:06+5:30

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ८७ वा रविवार असून, ...

Three tons of garbage in the sanitation campaign | स्वच्छता अभियानात तीन टन कचरा

स्वच्छता अभियानात तीन टन कचरा

googlenewsNext

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ८७ वा रविवार असून, यावेळी सामाजिक संघटना, एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मागर्दशनाखाली मोहीम झाली.

स्वरा फौंडेशनच्यावतीने तावडे हॉटेल ते मुस्कान लॉन येथे डिव्हायडरच्या बाजूची माती काढून स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वरा फौंडेशनचे डायरेक्टर विकी महाडिक, उपाध्यक्ष पीयूष हुलस्वार, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, सन्मेश कांबळे, सुनीता मेघानी, उन्मेश कांबळे, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, अमित देशपांडे यांच्यासह विवेकानंद कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट

स्वच्छता केलेला परिसर

निर्मिती कॉर्नर चौक ते रामानंदनगर चौक ते आयटी कॉलेज मेनरोड, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप मेनरोड, रंकाळा टॉवर ते जुना वाशीनाका चौक, कावळा नाका ते लिशा हॉटेल रोड, शिरोली जकात नाका ते तावडे हॉटेल चौक, भगवा चौक ते शुगरमिल चौक.

महापालिकेची यंत्रणा

१ जेसीबी, २ डंपर, १ टॅक्टर, २ औषध फवारणी टँकर, महापालिकेचे ७० कर्मचारी.

फोटो : २७१२२०२० कोल केएमसी स्वच्छता मोहीम

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

बातमीदार : विनोद

Web Title: Three tons of garbage in the sanitation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.