नोंदणी रद्द झालेल्या तीन आरामबस ताब्यात

By admin | Published: June 16, 2017 06:14 PM2017-06-16T18:14:44+5:302017-06-16T18:14:44+5:30

कोल्हापूर प्रादेशिक परिवहनची कारवाई ; स्कूल बसेसवरही कारवाईचा बडगा

Three unrestricted detention rest | नोंदणी रद्द झालेल्या तीन आरामबस ताब्यात

नोंदणी रद्द झालेल्या तीन आरामबस ताब्यात

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १७ : अरुणाचल परिवहन आयुक्तांनी नोंदणी रद्द केलेल्या २४०० बसेसपैकी ३ आरामबस कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ताब्यात घेतल्या. ही कारवाई प्रादेशिकच्या अंमलबजावणी पथकाने केली. यासह अद्यापही तपासणी करून न घेतलेल्या जिल्"ातील ३३१ स्कूल बसेसवर ‘परवाना निलंबन का करू नये’ अशी नोटीस बजावली जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकाने अरुणाचल परिवहन आयुक्तांनी तेथील २४०० आराम बसेसमध्ये असलेल्या विविध त्रुटींबाबत नोंदणी रद्द केली होती. त्याबद्दल देशातील सर्व राज्यांमधील परिवहन आयुक्तांना तेथील आयुक्तांनी रितसर पत्र दिले होते. त्यानुसार या बसेसमधील तीन बसेस प्रादेशिक परिवहनच्या अंमलबजावणी पथकाच्या निदर्शनास गुरुवारी आल्या. यावेळी रितसर कागदपत्रांची तपासणी करताना व आलेल्या सूचनेनुसार या बसेस ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेल्या बसेसमध्ये बस क्रमांक (एआर-०२-५७३३), (एआर-२०-६६६६), (एआर- ११ ए- ११००) असे आहेत.

यातील तिरूमला कॅब्स कंपनीच्या आराम बसमालकाने गुवाहाटी उच्च न्यायालयातून या कारवाईला स्थगिती आणली आहे. त्याबाबतची प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे त्यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांच्याकडे सादर केली.

स्कूल बसेसवरही कारवाईचा बडगा शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचा घर ते शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा. याकरिता राज्यातील स्कूल बसेसची तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वीच करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ७०६ बसेसपैकी ३७५ बसची तपासणी त्या-त्या मालकांनी करून घेतली आहे तर उर्वरित ३३१ स्कूल बसेस अद्यापही तपासणी करून घेतलेली नाही. अशा बसमालकांवर ‘परवाना निलंबन का करू नये’ अशाप्रकारच्या नोटिसा बजावल्या जातील, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

परराज्यांतील आराम बसेसमधून नागरिकांनी प्रवास करताना त्या बसची रितसर नोंदणी विधिग्रा" झाली आहे का हे पाहणे जरूरीचे आहे, अशी नोंदणी न झाल्यास त्यातून प्रवास करणे सुरक्षित नाही. त्याऐवजी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेसमधून प्रवास करावा. - डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अरुणाचल प्रदेश परिवहन आयुक्तांनी नोंदणी रद्द केलेल्या तीन बसेस ताब्यात घेतलेल्या तीन आराम बसेस.

Web Title: Three unrestricted detention rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.