तीनचाकी राज्य सरकारने दानत दाखवली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:13+5:302021-02-09T04:28:13+5:30

: लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत न मिळाल्यास मंत्रालयास घेराव घालू लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता ...

The three-wheeler state government did not show donation | तीनचाकी राज्य सरकारने दानत दाखवली नाही

तीनचाकी राज्य सरकारने दानत दाखवली नाही

Next

: लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत न मिळाल्यास मंत्रालयास घेराव घालू

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता व लहान उद्योजकांना अडचणीचा काळ होता. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे. तरीही या तीनचाकी सायकलवरील राज्य सरकारने दानत दाखवली नाही. लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत द्यावी, एवढीच मागणी आहे. ती सरकारला पूर्ण करावीच लागेल; अन्यथा थेट मुंबई मंत्रालयास घेराव घालू, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला.

लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत यासह वीज ग्राहकांसंदर्भातील विविध मागण्यांसह येथील ताराराणी पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आवाडे म्हणाले, सवलत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. महावितरणला सांगली जिल्ह्यातून ५२ कोटी, तर कोल्हापूर, शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी व आसपासची गावे मिळून २३ कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्या मानाने फक्त एकट्या इचलकरंजी विभागातून ५५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सर्वाधिक उत्पन्न इचलकरंजीतून मिळत असतानाही सवलतीची रक्कम मात्र अत्यल्प आहे. आमच्या मागणीनुसार लॉकडाऊन कालावधीसाठी सवलत द्यावयाची झाल्यास २.५० कोटी रुपये दरमहा लागतील, तर यंत्रमाग आणि लघुउद्योगांसाठी १ रुपयाची सवलत दिल्यास साडेतीन ते चार कोटी रुपये लागतील. एवढी रक्कम देणे सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

कृषी संजीवनीप्रमाणे यंत्रमागासाठी ‘यंत्रमाग संजीवनी’ योजना लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लघु उद्योजकांसाठीसुद्धा योजना लागू करणे आवश्यक आहे. मल्टीपार्टी कनेक्शनसंदर्भात मंत्र्यांनी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी नाही. यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवालही त्यांनी केला.

ताराराणी पक्ष कार्यालयापासून निघालेली मोटारसायकल रॅली शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून फिरून महावितरण कार्यालयावर आली. त्याठिकाणी आवाडे यांनी मार्गदर्शन केले व महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नीरज आहुजा यांना निवेदन दिले. मोर्चामध्ये जि. प. सदस्य राहुल आवाडे, 'ताराराणी'चे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, विलास गाताडे, मौसमी आवाडे, आदित्य आवाडे, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, शेखर शहा, नरसिंह पारीक आदींसह आवाडे समर्थक, यंत्रमागधारक, महिला, लघुउद्योजक व तृतीयपंथी सहभागी झाले होते.

चौकट

पक्ष ध्वजांचा मोठ्या प्रमाणात समावेश

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आवाडे समर्थकांनी ताराराणी पक्षाचे ध्वज मोठ्या प्रमाणात घेतले होते. निवडणुकीच्या प्रचार रॅलीप्रमाणे निघालेली ही मोर्चा रॅली पाहून उपस्थितांमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा होती.

फोटो ओळी ०८०२२०२१-आयसीएच-०२

०८०२२०२१-आयसीएच-०३ वीज बिलासंदर्भात विविध मागण्यांसाठी ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांनी महावितरणवर मोटारसायकल रॅली काढली.

Web Title: The three-wheeler state government did not show donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.